Gatha Mandir Dehu
Payment Details
Amount
Email
Phone
Pan Number
Date *
Full Name
Address
गाथा मंदिर देणगी योगदान

जगद्गुरु संत श्री. तुकोबाराय हे सकल संतांना प्रिय असलेले, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे संत, की ज्यांचे आपल्यावर अगणित उपकार आहेत. ते आपण हजारो जन्मातही फेडू शकत नाही. या ऋणातून अंशत: उतराई होण्याची सुवर्ण संधी गाथा मंदिराच्या रुपाने आपणास प्राप्त झाली आहे. आता ही सुवर्ण संधी कोणीही दवडू नये. शुद्धव्यवहाराने आपण धनार्जन करावे. व सत्पात्री दान देऊन अक्षय पुण्यप्राप्तीचा मार्ग प्रशस्त करावा. या श्री. तुकोबारायांच्या शिकवणुकीचा आपण अंतर्मुख होऊन विचार करावा. 


कारण सत्पात्री दान देणारा हा अधिक धनवान होतो ‘सुपात्रदानाच्च भवेत् धनाढ्य:’ व याच्या उलट कुपात्री दान देणारा दारिद्रयास प्राप्त होतो. ‘कुपात्रदानाच्च भवेत् दरिद्रो’ या शास्त्र वचनानुसार देव-ऋषी-पितृ ऋणातून उतराई होण्यासाठी सकलसमाजउपकारक असलेल्या या महान ऐतिहासिक स्मारकाला उदार अंत:करणाने व सढळ हातांनी मदत करावी. आपल्या या ट्रस्टला ८० जी. चे प्रमाणपत्र कायम स्वरुपी मिळालेले आहे. त्यामुळे ज्यांना आयकर शुल्क भरावे लागत असेल त्यांना आयकर माफीची ८० जी. ची सवलत मिळेल.


तरी भाविकांनी आपल्या या लोकोपकारक उत्तरोत्तर विशाल होत जाणाऱ्या कार्याचे स्वरूप लक्षात घेऊन थोडाही विलंब न करता १) बांधकाम निधी २) अन्नदान निधी ३) गोशाळा निधी ४) गुरुकुल निधी इत्यादी दानप्रकारात यथाशक्ती भरघोस मदत करुन आपले हे श्रद्धास्थान अखिल विश्वाला नित्य दर्शनीय, पूजनीय, स्मरणीय ठरण्यास मदत करावी ही साग्रह नम्र विनंती.

You agree to share information entered on this page with Gatha Mandir Dehu (owner of this page) and Razorpay, adhering to applicable laws.
April
SunMonTueWedThuFriSat
303112345678910111213141516171819202122232425262728293012345678910